श्री तानाजी मारकड यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

जय हनुमान बहुउद्देशीय संस्था रुई अध्यक्ष श्री तानाजी मारकड यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. इंदापूर प्रतिनिधी (दि,२६): महेश गडदे. २६ जानेवारी २०२३ देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनी पोलीस संचलन मैदान शिवाजीनगर पुणे येथे *उत्कृष्ट जिल्हास्तरीय युवा संस्था पुरस्कार २०२१-२०२२ भारत सरकार युवा कार्यक्रम क्रिडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र पुणे चा पुरस्कार 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्था रूई, तालुका-इंदापूर, जिल्हा - पुणे, ला नामदार चंदकांत (दादा) पाटील कॅबिनेट मंत्री उच्च व तंत्र शिक्षण तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या हस्ते व विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, नेहरू युवा केंद्र पुणे, मुंबई चे उपसंचालक यशवंत मानखेडकर सर, यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव मारकड यांना प्रदान करण्यात आला, यावेळी 'पुणे जिल्हा प्रशासनाने सर्व प्रमुख अधिकारी, पोलीस आयुक्त, नेहरू युवा केंद्राचे चव्हाण सर, 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते, आबासाहेब थोरात कार्याध्यक्ष भाजपा जि.ओबीसी सेल, शंकरराव मारकड सचिव, अंकुश पाट...