जय हनुमान बहुउद्देशीय संस्था रुई,इंदापूर यांना जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जाहीर : तानाजी मारकड.
जय हनुमान बहुउद्देशीय संस्था रुई.ता.इंदापूर जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जाहीर:तानाजी मारकड.
इंदापूर प्रतिनिधी: महेश गडदे.
जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री तानाजी मारकड. यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,यांना बरोबर घेऊन केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हाधिकारी यांनी, भारत सरकार युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय, नेहरू युवक केंद्र संघटन पुणे, कार्यालय जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या युवा मंडळ पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे,
पुरस्काराचे स्वरूप 'सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,२५ हजार रुपये अशाप्रकारे आहे,
हा पुरस्कार
२६ जानेवारी २०२३ रोजी पुणे येथे पुणे जिल्हाचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , नेहरू युवा केंद्राचे मुंबई, पुणे चे उपसंचालक यांच्या हस्ते पुणे येथे 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेला प्रधान करण्यात येणार आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा