इंदापूर;आंतरशालेय नाट्य स्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मिळविला प्रथम क्रमांक.
आंतरशालेय नाट्य स्पर्धेत अभंगवस्ती शाळेने मिळविला प्रथम क्रमांक.
इंदापूर (दि) प्रतिनिधी: महेश गडदे.
दिनांक २२/१२/२०२२ रोजी भवानीनगर तालुका इंदापूर येथे या स्पर्धा संपन्न झाल्या..या कार्यक्रमासाठी भोर, बारामती तालुक्यातून परीक्षक उपस्थित होते तसेच विद्यालयाचे प्राचार्य मचाले सर हे आयोजक म्हणून होते
पुणे जिल्हा परिषद आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवस्तीने प्रथम क्रमांक मिळवला व जिल्हास्तरासाठी ही शाळा पात्र ठरली आहे.
"सुदृढ मन" नावाच्या या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन मुख्याध्यापिका सौ.स्वाती सुरेश लोंढे यांनी केले होते,तर श्रुती अभंग, ओंकार अभंग, भक्ती अभंग, युवराज बारवकर, सार्थक अभंग, गौरव बारवकर, सुप्रिया बारवकर, श्रेयश बारवकर, सार्थक जाधव तेजस्विनी अभंग, समीक्षा नाटकर, गोपाळ अभंग या विद्यार्थ्यांनी या नाटिकेत सहभाग घेतला होता.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. पूनम अभंग व सहशिक्षिका सौ. अश्विनी हेगडे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा