आम आदमी पार्टी इंदापूरात लढवणार सर्व निवडणुका, बैठकीत घेतले निर्णय.
आम आदमी पार्टी इंदापूरात लढवणार सर्व निवडणुका, बैठकीत घेतले निर्णय.
इंदापूर प्रतिनिधी (दि)महेश गडदे.
इंदापूर येथे आम आदमी पार्टी च्या पदाधिकारी यांची बैठक झाली बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इंदापूर येथे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मुकुंद किर्दक यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टी ची कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आगामी काळात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, इंदापूर नगरपालिका निवडणूक पूर्ण लढवण्याची व पक्ष बांधणी ची चर्चा या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला पुणे जिल्हा संघटक श्री अक्षय शिंदे, इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ प्राजक्तताई रासकर, श्री अविनाश जाधव, श्री आण्णा पाटील, श्री बाळासाहेब जगताप, श्री हनुमंत वाघमोडे व पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा