इंदापूर:कडबनवाडी वनक्षेत्राला अतिरिक्त मुख्य सचिव CMO प्रविण परदेशी यांनी दिली भेट.
कडबनवाडी वनक्षेत्राला अतिरिक्त मुख्य सचिव PMO प्रवीण परदेशी यांनी दिली भेट.
इंदापूर प्रतिनिधी; महेश गडदे.
१३ जानेवारी २३ रोजी इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील वनक्षेत्रा मध्ये अतिरिक्त मुख्य सचिव PMO श्री प्रवीण परदेशी साहेब ,मा.श्री.राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे(भा.व. से) , श्री श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर , आशुतोष शेंडगे, सहायक वनसंरक्षक (म. व. से) श्री. अजित सूर्यवंशी वनपरीक्षेत्र अधिकारी इंदापूर तसेच श्री भजनदास पवार सर, एडवोकेट सचिन राऊत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी पूर्ण टीम यामध्ये कडबनवाडी गावातील सरपंच ,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या तालुक्याचे आमदार श्री दत्तामामा भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या वन उद्यानाला तसेस लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कला भेट दिली.
अतिरिक्त मुख्य सचिव PMO प्रवीण परदेशी व उपवनसंरक्षक राहुल पाटील.तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले .पूर्ण वनक्षेत्रामध्ये त्यांनी फेरफटका मारला व कडबनवाडी गावातील झालेल्या जलसंधारणाच्या आणि पर्यावरणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली तसेच वनक्षेत्राच्या बाजूच्या रस्त्यांसर्भात ही चर्चा झाली .
राज्यातील प्रशासणाचे प्रमुख इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात आले ही गावकऱ्यांसाठी नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.
.वनपर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा लवकरच करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा