अहिल्यादेवी म्हणजे जगातील सर्वात लोक कल्याणकारी महाराणी. नाथाभाऊ शेवाळे.

अहिल्यादेवी म्हणजे जगातील सर्वात लोक कल्याणकारी महाराणी. नाथाभाऊ शेवाळे. इंदापूर (दि.27)प्रतिनिधी; महेश गडदे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 227 व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलताना म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये देशभर कार्यरत राहून अनेक लोकोपकारी कार्य केले. त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्या त्याचबरोबर योग्य तो न्यायनिवाडा केला स्वतःच्या खाजगी उत्पन्नातील संपत्ती मंदिरे धर्मशाळा नदीवरील घाट रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वाटसरूंना पाणी पिण्यासाठी बारवा बांधल्या असे अनेक कार्य त्यांनी केले. त्यांच्या एवढे दानशूर व न्यायप्रिय प्रजाहितदक्ष महाराणी इतिहासात दुसरे कोणीही झाले नाही. सदर कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर येथील पोपट् नाना पवार मित्र मंडळाने केले होते यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने, सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई कोकाटे शिरूर तालुका रासप...