थोरातवाडी जि.प.प्रा.शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

 इंदापूर;थोरातवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


इंदापूर (दि-१५) प्रतिनिधि;महेश गडदे.

इंदापूर थोरातवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काडून, स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा दिल्या.

 स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरूषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या जिवनावर विद्यार्थ्यांनी भाषण केले,व त्यांच्या कार्याची माहिती नागरिकांना देण्याचा आपल्या भाषणातून प्रयत्न केला, विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले .


झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देऊन झाडांचे महत्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले.यावेळी शिक्षक शेंडे सर,भगत सर, आंगनवाडी शिक्षिका जयश्री मॅडम, सेविका संगीता मॅडम,आशासेवीका लवटे मॅडम उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक हरिबा शिंदे,पोलिस पाटिल नाना साहेब थोरात, भाजपा चे नेते आबासाहेब थोरात, ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा साहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर तालुका अध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कॅशियर राजु गडदे ,बाळू लवटे, अण्णा लवटे, दादा कचरे.नागरिक मोठ्या संकेत उपस्थित  होते,


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.