रूई;श्री बाबीर विद्यालयात १०० गरजूं विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
रूई;श्री बाबीर विद्यालयात १०० गरजूं विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
बाबीर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना प्रविण माने व इतर मान्यवर
ऑगस्ट(३) रुई(ता.इंदापूर) महेश गडदे.
श्री बाबीर विद्यालयात बुधवार(दि 3) रोजी विद्यालयाचे संस्थापक कै.आत्माराम बाबुराव पाटील यांच्या 17 व्या पुण्यतिथी निमित्त या परिसरातील निराधार,गरजू १०० विद्यार्थांना पाटील परिवार, कामधेनू परिवार,जनार्धन पांढरमिसे,लाला मारकड,बंडू पुणेकर,विकास गांधी,रोहित हार्डवेअर,बापू मारकड,भागवत किराणा,शेखर पाटील,महेश मारकड,सागर भोंग यांच्या वतीने
मोफत गणवेश वाटप पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने व इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माने म्हणाले कि या विद्यालयातुन अनेक नामांकित विद्यार्थी तयार होउन आज चांगल्या पदावर काम करीत आहेत .कै. आत्माराम पाटील यांनी 1991 साली मूळ मुलींची शिक्षणाची सोय करून दिली.त्या काळात त्यांनी स्वतःचा वाडा वर्गखोल्यासाठी मोकळा करून दिला आणि आज जवळ जवळ 700 विद्यार्थीं या शाळेत शिक्षण घेत आहेत असे फार मोठे शिक्षणाचे कार्य कै, भाऊंनी निर्माण करून दिले आणि या विद्यालयासाठी भविष्य काळात शाळेची समस्या सोडवण्यासाठी स्वखर्चाने मदत करण्याचे आश्वासन देखील जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी यशवंत कचरे,बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील,संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,विजयसिंह पाटील,अर्जुन पाटील,मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक तानाजी मराडे ,शिक्षिका सौ मिरदेवी पाटील व सौ प्रतीक्षा उदयसिंह पाटील यासह अंकुश लावंड,मोहन लावंड,शरद लावंड,बबन मारकड इत्यादी उपस्तीत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी यांनी केले तर सर्जेराव मारकड यांनी उपास्थितांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा