इंदापूर:माळवाडी नंबर १ येथे तिरंगा ध्वजाचे वाटप; लक्ष्मण गडदे
इंदापूर:माळवाडी नंबर १ येथे तिरंगा ध्वजाचे वाटप; लक्ष्मण गडदे.
भारत देशाच्या स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारत सरकारने हर घर तिरंगा ही योजना राबवली आहे.
प्रतिनिधि;महेश गडदे ( दि-१३)
भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या मातृभूमीला परकीय सत्ताच्या अत्याचारातून गुलामगिरीतून स्वतंत्र करण्यासाठी भारत देशातील अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक ,साहित्यिक, अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.या महापुरुषांच्या कार्याची पराक्रमाची,शौर्याची, त्यागाची आठवण प्रेरणा येणाऱ्या पिढीतील तरुण युवकांनी आचरणात आणण्यासाठी आणि या महापुरुषांमुळे मिळालेल्या स्वतंत्र्याचा दुरुपयोग न करता देशहितासाठी चिरकाळ झगडत राहणे आपले जीवन देशहितासाठी समर्पित करणे देशाच्या प्रगतीसाठी जगणे हा आहे
याच दृष्टिकोनातून भारत सरकारने हरघर तिरंगा राबवलेल्या योजनेसाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण युवा कार्यकर्ते पुढे सरसावलेले आहे माळवाडी 1 मधील सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण गडदे सर व राजमाता तरुण मित्र मंडळ माळवाडी नंबर 1 मधील युवकांनी गावात तिरंगा झेंडा देऊन या हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच राघू मदने ग्रामसेवक श्री. आटोळे साहेब श्री. लक्ष्मण गडदे सर श्री.दादासाहेब व्यवहारे डॉक्टर अमित गडदे श्री. प्रकाश गडदे श्री रोहिदास गडदे श्री संजय वाघमोडे श्री. विलास गडदे श्री. योगीराज सुळ पाटील श्री ज्ञानदेव लवटे बापू गडदे चि. सिद्धार्थ गडदे श्री. कांतीलाल गडदे श्री. ज्ञानदेव गडदे श्री. सुरेश गडदे श्री. रमेश गडदे,विजय गडदे नामदेव मदने तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा