श्री बाबीर विध्यालयातील शिक्षक उस्मान मुलाणी यांची भारत नेपाळ शिक्षक एवं साहित्यकार संमेलन च्या केंद्रीय समन्वयकपदी निवड.

 भारत नेपाळ शिक्षक एवं साहित्यकार संमेलन च्या केंद्रीय समन्वयकपदी उस्मान मुलाणी यांची निवड.


इंदापूर (दि-१४)प्रतिनिधि; महेश गडदे.

1 नोव्हेबर 2022 रोजी काठमांडू नेपाळ येथे भारत नेपाळ हिंदी शिक्षक तथा साहित्यिक संमेलन होत आहे दोन्ही देशाचे सुमारे शंभर हिंदी शिक्षक तथा साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत या संमेलनाच्या केंद्रीय समन्वयक पदी श्री बाबीर विद्यालय रुई ता इंदापुर या शाळेचे हिंदी शिक्षक तथा आदर्श हिंदी शिक्षक उस्मान मुलाणी यांची निवड झालीआहे.

सदर निवड मुख्य संयोजक डॉ कैलास जाधव भारत सरकार व स्वागताध्यक्ष डॉ संगीता ठाकुर काठमांडो नेपाळ यांनी केली या कार्यक्रमास प्रमुख मा बाबूराम भटटरायजी पूर्व प्रधानमंत्री नेपाळ सरकार हे उपस्थित राहणार आहेत या बद्दल श्री बाबीर विद्यालय रुईचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याध्यापक पाटील जे एन यांनी त्याचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.