पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.

इमेज
अपक्ष उमेदवार प्रविण माने यांना स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) यांचा पाठींबा.  Zee Maharashtra News. mahesh gadade. इंदापूर.ता.१४: इंदापुर -२०० विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रविन (भैया) माने यांनी राजकारण व समाजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे व सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धाऊन जानारे एक युवा नेतृत्व म्हणून जनसामान्यात त्यांनी आपली एक वेगळी प्रतीमा तयार केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रेय मांजरेकर यांच्या आदेशावरुन इंदापूर विधानसभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.  इंदापुर तालुक्याच्या वतीने स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेयर समिति (दिल्ली) यांच्या कडुन समिति चे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागरभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडीचे उमेवार प्रवीण (भैया) माने तसेच पदाधिकारी यांच्या असंख्य कार्यकरत्यांच्या उपस्थितीत जाहिर पाठींबा देण्यात आला  त्या वेळी स्वराज्य...

विजय भरणे यांचा अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा.

इमेज
भरणेवाडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय भरणे यांचा प्रवीण माने यांना पाठिंबा. भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजय भरणे यांचा प्रवीण माने यांचा उपस्थित परिवर्तन विकास आघाडी मध्ये जाहीर प्रवेश. Zee Maharashtra News.  - महेश गडदे. इंदापूर.ता.१४: इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. इंदापूर मध्ये राजकीय लढाई मोठ्या चुरशीची होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष इंदापूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीवर आहे. इंदापुरात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण दशरथ माने यांना इंदापुरातून सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.   इंदापुरात राजकीय वातावरण वेगाने घडामोडी घडत असताना आज (दिनांक 14) रोजी भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय भरणे यांनी इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजय भरणे यांच्या पाठिंबामुळे प्रवीण माने यांना मोठा फायदा होणार आहे. प्रवीण माने यांना इंदापूर शहर व ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आ...

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

इमेज
सुरवड (ता. इंदापूर) येथे प्रचार सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील. • महिलांना मोफत एसटी प्रवास! •18 वर्षे पूर्ण झालेवर मुलीस देणार रु. 1लाख   •महिलांना वर्षाला 500 रुपयात 6 सिलेंडर  Zee Maharashtra News,- Mahesh Gadade. इंदापूर.ता.१२: राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना रु. 3000 प्रमाणे रक्कम जमा करणार आहे. तसेच महिलांना मोफत एसटी प्रवास, मुलींना 18 वर्षे पूर्ण झालेवर रु. 1लाख रक्कम व महिलांना वर्षाला 500 रुपयात 6 सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार हे महिला भगिनींचे सरकार असणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.           हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.12) सुरवड, पिंपरी बु., लाखेवाडी, निरवांगी, वरकुटे खु. या गावांचा झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात सुरव...

हर्षवर्धन पाटील यांचे विषयी वाढतेय सहानभूती.. चक्क उमेदवाराने दिला पाठिंबा!

इमेज
• आमची माती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा!  •इंदापूर तालुक्यात 60 गावात ग्रुपचे काम   Zee  महाराष्ट्र न्यूज, महेश गडदे. इंदापूर.ता.११: इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचे विषयी जनतेमध्ये सहानुभूती वाढत असून, आपली नाती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचे उमेदवार भीमराव जगन्नाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना ग्रुपच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे. इंदापूर येथे आयोजित मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचेकडे रविवारी (दि.10) ग्रुपने पाठिंबाचे पत्र सुपूर्द केले.              हर्षवर्धन पाटील म्हणाले, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या सामाजिक जाणवेतून हा परिवार चांगले काम करीत आहे. या ग्रुपला आमचे कायम सहकार्य राहील, उपकाराची जाणीव ठेवणारे संस्कार आमचेवर आहेत. इंदापूर विधानसभा निवडणुकीत सक्रिय पाठिंबा दिलेबद्दल आमची माती, आपली माणसं, आपला परिवार ग्रुपचे हर्षवर्धन पाटील यांन...

पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या इंदापूरच्या आमदारांना जागा दाखवून द्या- हर्षवर्धन पाटील .

इमेज
• बिजवडी परिसरात झंजावती दौरा  •मतदारांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या विषयी आपुलकीची भावना! Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.) इंदापूर.ता.१०: इंदापूरचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे आजपर्यंत पवार साहेबांच्या आशीर्वादावर विधानसभेला निवडून येत होते. त्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी भरभरून दिले. तरीही पवार साहेबांशी अडचणीच्या काळात गद्दारी करणाऱ्या इंदापूरच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी व पवार साहेबांना साथ द्यावी, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.           हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.10) बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी या गावांमध्ये झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात पोंदकुलवाडी (ता. इंदापूर) येथे हर्षवर्धन पाटील यांचे जोरदार भाषण झाले. हर्षवर्धन पाटील यांच्या दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश निर्माण करण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी झाल्या...

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

इमेज
Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे. इंदापूर.ता.०१: संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान इंदापूर रुई येथील श्री बाबीर देवाचा यात्रा महोत्सव शनिवार (दि.०२) पासून प्रारंभ होणार आहे. यांत्रेची सांगता सोमवार (दि.०४) होणार आहे. ऑक्टोंबर शुक्रवार (दि.२५) सकाळी ११ वा बाबीर देवाची घटस्थापना देवाचे मानकरी आप्पा थोरात व मधु थोरात यांच्या हातून झाली. बाबीर देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र सह देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रुई ग्रामपंचायत व देवस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी हजेरी लावणारा आहेत अशी माहिती बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध ठिकाणाहून लाखो भाविक येतात सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे बाबीर देवाच्या दर्शनासाठी इंदापूरसह राज्यभरातील मोठ मोठे दिग्गज व राजकीय नेते मंडळी यात्रेमध्ये हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेणार...

हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी नागरिकांची अलोट गर्दी !

इमेज
दिपावली निमित्त इंदापूरात मान्यवरांची मंदियाळी!  भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देताना झालेली गर्दी. Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे. इंदापूर. दि.०१: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाग्यश्री निवासस्थानी परंपरेनुसार दिपावली फराळ स्नेह कार्यक्रम हजारो नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये व उत्साही वातावरणात गुरुवारी (दि.31) संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी मंदियाळी पहावयास मिळाली.           हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व कुटुंबीयांकडून प्रत्येक वर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील जनतेशी कौटुंबिक नाते जपले आहे, याचा प्रत्यय भागश्री बंगल्यावर झालेल्या प्रचंड जनसागराच्या रूपाने दिसून आला. याप्रसंगी तुतारीच्या मंगलमय आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले होते.  यानिमित्ताने भाग्यश्री बंगलो परिसर हा राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर, सर्वधर्मीय नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींच्या गर्...