विजय भरणे यांचा अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा.
भरणेवाडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय भरणे यांचा प्रवीण माने यांना पाठिंबा.
भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजय भरणे यांचा प्रवीण माने यांचा उपस्थित परिवर्तन विकास आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.
Zee Maharashtra News.
- महेश गडदे.
इंदापूर.ता.१४: इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. इंदापूर मध्ये राजकीय लढाई मोठ्या चुरशीची होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष इंदापूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीवर आहे. इंदापुरात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण दशरथ माने यांना इंदापुरातून सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
इंदापुरात राजकीय वातावरण वेगाने घडामोडी घडत असताना आज (दिनांक 14) रोजी भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय भरणे यांनी इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भरणेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजय भरणे यांच्या पाठिंबामुळे प्रवीण माने यांना मोठा फायदा होणार आहे. प्रवीण माने यांना इंदापूर शहर व ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या पक्षप्रवेशाच्या वेळी कळस गावचे पप्पू खारतोडे, युवा नेते निलेश खारतोडे, शुभम शिंगाडे, नाना धापटे, सचीन काळे, गोसावीवाडी सोसायटीचे व्हासचेरमन देविदास खारतोडे, अजित पोरे, बापू भरणे, बाळासाहेब धापटे, सचीन चवरे, गणपत चवरे, सुधीर शिंगाडे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा