पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूरातील सर्व ग्रामपंचायती मध्ये बायोमेट्रिक प्रणाली तात्काळ सुरू करण्याचे आदेश !

इमेज
महेश गडदे यांच्या पाठपुरावा यश,ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार. ता. २५: पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक वेळेत हजर राहत नसल्यामुळे अनेक नागरिकांचे कामांचा खोळंबा होत आहे अशा अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांनी कार्यालयात वेळेत हजर रहावे यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसवणे अत्यंत गरजेचे होते. त्या अनुषंगाने महेश गडदे यांनी दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना आदेश जा.क्र.आस्था २/वशि/ ३१८/ २०२३ दिनांक १५/२/२०२४ रोजीच्या पत्रात आदेश दिले आहेत.  इंदापूर तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना कार्यालयालयीन वेळत भेटत नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा आणि वेळेचा खोळंबा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात विनाविलंब बायोमेट्रिक प्रणाली बसवणेत यावी असे आदेश गटविकास अधिकाऱ्याने दिल्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा व दिलासा मिळणार आहे. महेश ...

जय हनुमान बहुउद्देशीय संस्था (भारत सरकार चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त) वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

इमेज
'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २० सप्टेंबर २०१३ रोजी 'स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजाराम मोहन रॉय, आत्माराम पाटील, यांच्या विचाराने व महादेव जानकर साहेब यांच्या प्रेरणेतून व स्व.तात्याबा रामा मारकड यांच्या आशीर्वादाने तानाजी मारकड यांनी वयाच्या २१ व्या वर्षी सामाजिक कार्याचा उदात्त हेतू ठेवून या संस्थेची स्थापना केली. महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व लहान वयातच आजोबा तात्याबा रामा मारकड यांच्या बरोबर आठ-नऊ वर्षाचा असताना त्यांनी आपल्या नातूवर लहान वयातच समाजसेवेचे लोककल्याणाचे धडे दिले, तात्याबा मारकड हे हनुमान भक्त होते ते जनावरांचा तकला,भिरुड काढायचे ते विनामूल्य प्राणीमात्रांची सेवा करायचे ते हनुमानाची पूजा दर्शन घेण्यासाठी रुई गावामध्ये चालत जायचे, जाण्यासाठी लांब असण्यामुळे त्यांनी १९९९ ला तळेवस्ती येथे हनुमानाची मूर्ती मांडून पूजा सुरू केली, व १९९९ पासून हनुमान जयंती सुरु केली. २००१ ला लोकसहभागातून...

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने संतोष भरणे यांना सन्मानित.

इमेज
श्री. संतोष भरणे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित. Zee महाराष्ट्र न्यूज- महेश गडदे. इंदापूर दिनांक (१७) कळस ता. इंदापूर येथील पत्रकार संतोष भरणे यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले १५ सप्टेंबर २०२४ रोजी एस. फोर. जी हॉटेल थेऊर फाटा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व भव्य दिव्य आयडॉल गुणगौरव पुरस्कार सोहळा राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राष्टीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराची निवड राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडीयाचे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी केली आहे.या पुरस्कार वितरण सोहळा साठी सिने अभिनेते मा.महेश देवकाते पाटील, सिने अभिनेत्री सायली पाटील ,मुख्य संपादक मा.राहुल कुदनर जिल्हा प्रतिनीधी विशाल अडागळे व पुणे जिल्हा टीम व महाराष्ट्र शासन गृहमंत्रालय सचिव महादेव सातपुते सर पुणे पोलीस ...

इंदापूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात तर सचिवपदी अविनाश घाटे.

इमेज
इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात. नव निर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करताना आ. दत्तात्रय भरणे. Zee  महाराष्ट्र न्यूज. - महेश गडदे. इंदापूर.ता.०१: इंदापूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वालचंदनगर येथील राजकुमार थोरात तर सचिवपदी अविनाश घाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषद संलग्नित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच निवड रविवार (दि.०१) रोजी ग्रामपंचायत सचिवालय भरणेवाडी येथे करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी राजकुमार थोरात, सचिवपदी अविनाश घाटे, उपाध्यक्षपदी शत्रुघ्न ओमासे, शहाजीराजे भोसले, गजानन टिंगरे, खजिनदारपदी हरिदास वाघमोडे, सह खजिनदार महेश गडदे, संघटकपदी धनंजय थोरात, बाळासाहेब धवडे, समन्वयकपदी संतोष भरणे, सहसंघटकपदी बाळासाहेब रणवरे, सहसचिव प्रदिप तरंगे सल्लागारपदी डॉ विकास शहा यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवि पाट...