इंदापूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात तर सचिवपदी अविनाश घाटे.


इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात.


नव निर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करताना आ. दत्तात्रय भरणे.

Zee  महाराष्ट्र न्यूज. - महेश गडदे.

इंदापूर.ता.०१: इंदापूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वालचंदनगर येथील राजकुमार थोरात तर सचिवपदी अविनाश घाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषद संलग्नित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच निवड रविवार (दि.०१) रोजी ग्रामपंचायत सचिवालय भरणेवाडी येथे करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी राजकुमार थोरात, सचिवपदी अविनाश घाटे, उपाध्यक्षपदी शत्रुघ्न ओमासे, शहाजीराजे भोसले, गजानन टिंगरे, खजिनदारपदी हरिदास वाघमोडे, सह खजिनदार महेश गडदे, संघटकपदी धनंजय थोरात, बाळासाहेब धवडे, समन्वयकपदी संतोष भरणे, सहसंघटकपदी बाळासाहेब रणवरे, सहसचिव प्रदिप तरंगे
सल्लागारपदी डॉ विकास शहा यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवि पाटील यांनी काम पाहिले यावेळी जिल्हा सरचिटणीस सतीश सांगळे, कार्यकारिणी सदस्य रोहीत वाघमोडे उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.