इंदापूरातील सर्व ग्रामपंचायती मध्ये बायोमेट्रिक प्रणाली तात्काळ सुरू करण्याचे आदेश !
ता. २५: पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक वेळेत हजर राहत नसल्यामुळे अनेक नागरिकांचे कामांचा खोळंबा होत आहे अशा अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांनी कार्यालयात वेळेत हजर रहावे यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसवणे अत्यंत गरजेचे होते. त्या अनुषंगाने महेश गडदे यांनी दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,
ग्रामविकास अधिकारी यांना आदेश जा.क्र.आस्था २/वशि/ ३१८/ २०२३ दिनांक १५/२/२०२४ रोजीच्या पत्रात आदेश दिले आहेत.
इंदापूर तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना कार्यालयालयीन वेळत भेटत नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा आणि वेळेचा खोळंबा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात विनाविलंब बायोमेट्रिक प्रणाली बसवणेत यावी असे आदेश गटविकास अधिकाऱ्याने दिल्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा व दिलासा मिळणार आहे. महेश गडदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने सर्वसामान्य नागरीकांनी त्यांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा