राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने संतोष भरणे यांना सन्मानित.

श्री. संतोष भरणे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

Zee महाराष्ट्र न्यूज- महेश गडदे.

इंदापूर दिनांक (१७) कळस ता. इंदापूर येथील पत्रकार संतोष भरणे यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले १५ सप्टेंबर २०२४ रोजी एस. फोर. जी हॉटेल थेऊर फाटा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व भव्य दिव्य आयडॉल गुणगौरव पुरस्कार सोहळा राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राष्टीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराची निवड राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडीयाचे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी केली आहे.या पुरस्कार वितरण सोहळा साठी सिने अभिनेते मा.महेश देवकाते पाटील, सिने अभिनेत्री सायली पाटील ,मुख्य संपादक मा.राहुल कुदनर जिल्हा प्रतिनीधी विशाल अडागळे व पुणे जिल्हा टीम व महाराष्ट्र शासन गृहमंत्रालय सचिव महादेव सातपुते सर पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट 6 कर्तव्यदक्ष अधिकारी ऋषिकेश व्यवहारे ,महाराष्ट्र मिसिंग ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर अनेक राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा,क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.