पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापुरातील ८ केंद्रात झालेल्या प्रज्ञाशोध अभियान परीक्षेला, ४०८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग..

इमेज
इंदापूर प्रतिनिधी (दि) महेश गडदे. इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट व गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्या मार्गदर्शनाने व सतिश भोंग जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी इंदापूर तालुका प्रज्ञाशोध अभियान २०२३ तालुक्यातील ८ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.  इंदापूर तालुका प्रज्ञाशोध अभियान अंतर्गत इयत्ता ३ री वर्गाचा पेपर १ भाषा व गणित गुण १५०,पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण १५० व इयत्ता ४ वर्गाचा पेपर १ भाषा व गणित गुण १५० पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण १५० परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एकूण आठ केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा घेण्यात आलेली केंद्र: १) श्री नारायणदास हायस्कूल, इंदापूर २) श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी ३) श्री. काटेश्वर विद्यालय, काटी ४) नंदिकेश्वर विद्यालय, जंक्शन ५) श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर ६) श्री कोंडीराम क्षिरसागर विद्यालय, भिगवन ७) एल. जी. बनसोडे इंग्लिश मेडियम स्कूल ८) श्री शिवाजी विद्यालय, बावडा या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा अतिशय सुरळीतपणे पार पडली. परीक्...

मुलाच्या वाढदिवसा निमीत्त शाळेतील मुलांना शिक्षकाकडून पुस्तके वाटप.

इमेज
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून मुलांना श्रेयशी प्रकाशनची दर्जेदार पुस्तकांचे वाटप. इंदापुर प्रतिनिधी (दि) महेश गडदे. दि.५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे कार्यरत असणारे उपशिक्षक तथा शिक्षक समिती इंदापूर कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी चि. शुभम याचा वाढदिवस शाळेतील ६१ मुलांना श्रेयशी प्रकाशनचे उन्हाळी अभ्यास हे पुस्तक देवून साजरा केला. हे पुस्तक चालू इयत्ता व नवीन इयत्तेची पुर्व तयारीसाठी चांगले आहे.             शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री साहेबराव पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य श्री आण्णा काळेल,मुख्याध्यापक श्री नंदकुमार सूर्यवंशी,उपशिक्षिका आरती गायकवाड यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पालक, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व मुलांनी चि.शुभम यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

इंदापुर कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी .

इमेज
कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी. इंदापूर प्रतिनिधी (दि) महेश गडदे. दिनांक.११ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे महात्मा फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर शाळेतील शिक्षिका आरती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. मुलांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी केले.

सी.वाय.डी.ए. प्राज फाऊंडेशन व पंचायत समिती, इंदापूरच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा संपन्न.

इमेज
पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी "मूलभूत वाचन-लेखन-आकलन” हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. सी.वाय.डी.ए. प्राज फाऊंडेशन व पंचायत समिती, इंदापूरच्या वतीने शिक्षक सन्मान करण्यात आला. इंदापूर प्रतिनिधि (दि.१४) महेश गडदे.  सी.वाय.डी.ए. आणि प्राज फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या “मूलभूत वाचन-लेखन-आकलन” प्रकल्पांर्गत इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकून ५१ शाळेतील शिक्षकांना इंदापूर पंचायत समितीमधील लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. इंदापूर तालुक्यात सी.वाय.डी.ए., प्राज फाउंडेशन, आणि पंचायत समिती, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मूलभूत वाचन-लेखन-आकलन” हा प्रकल्प इयत्ता पहिली ते चौथीच्या एकून २२०० विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. यामधून कोरोना काळात मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवला गेला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विविध अंगाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भरीव काम करण्यात आले. यासोबतच शिक्षक कार्यशाळेद्वारे शि...