सी.वाय.डी.ए. प्राज फाऊंडेशन व पंचायत समिती, इंदापूरच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा संपन्न.
पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी "मूलभूत वाचन-लेखन-आकलन” हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे.
इंदापूर प्रतिनिधि (दि.१४) महेश गडदे.
सी.वाय.डी.ए. आणि प्राज फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या “मूलभूत वाचन-लेखन-आकलन” प्रकल्पांर्गत इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकून ५१ शाळेतील शिक्षकांना इंदापूर पंचायत समितीमधील लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. इंदापूर तालुक्यात सी.वाय.डी.ए., प्राज फाउंडेशन, आणि पंचायत समिती, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मूलभूत वाचन-लेखन-आकलन” हा प्रकल्प इयत्ता पहिली ते चौथीच्या एकून २२०० विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. यामधून कोरोना काळात मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवला गेला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विविध अंगाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भरीव काम करण्यात आले. यासोबतच शिक्षक कार्यशाळेद्वारे शिक्षकांमधील कौशल्यांना वाव देऊन शिक्षण तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पालकांचा आपल्या मुलांच्या शिक्षणातील सहभाग वाढावा यासाठी एकून १७४० पालकांना प्रत्यक्ष भेटी व पालक सभान्द्वारे जागृती निर्माण करण्यात आली.
सदरील प्रकल्पात इंदापूर तालुक्यातील शिक्षकांनी उत्कृष्ट योगदान दिल्याबाबत सी.वाय.डी.ए, प्राज फाउंडेशन आणि इंदापूर पंचायत समितीच्या वतीने एकूण १०२ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे विजयकुमार परीट, (गटविकास अधिकारी, इंदापूर) अजिंक्य खरात (गटशिक्षणअधिकारी), संदीप काळे (प्राज इंडस्ट्रीचे वरीष्ठ पदाधिकारी), शांताराम बडगुजर, तसेच तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते. सदर मान्यवरानी उपस्थित शिक्षकवृन्दाला विद्यार्थी केन्द्रित शिक्षणावर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृतिशील शिक्षक संतोष हेगडे व कंदमाला राऊत मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा