इंदापुरातील ८ केंद्रात झालेल्या प्रज्ञाशोध अभियान परीक्षेला, ४०८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग..

इंदापूर प्रतिनिधी (दि) महेश गडदे.

इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट व गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्या मार्गदर्शनाने व सतिश भोंग जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी इंदापूर तालुका प्रज्ञाशोध अभियान २०२३ तालुक्यातील ८ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. 

इंदापूर तालुका प्रज्ञाशोध अभियान अंतर्गत इयत्ता ३ री वर्गाचा पेपर १ भाषा व गणित गुण १५०,पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण १५० व इयत्ता ४ वर्गाचा पेपर १ भाषा व गणित गुण १५० पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण १५० परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एकूण आठ केंद्रावर घेण्यात आली.
परीक्षा घेण्यात आलेली केंद्र: १) श्री नारायणदास हायस्कूल, इंदापूर २) श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी ३) श्री. काटेश्वर विद्यालय, काटी ४) नंदिकेश्वर विद्यालय, जंक्शन ५) श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर ६) श्री कोंडीराम क्षिरसागर विद्यालय, भिगवन ७) एल. जी. बनसोडे इंग्लिश मेडियम स्कूल ८) श्री शिवाजी विद्यालय, बावडा या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा अतिशय सुरळीतपणे पार पडली. परीक्षा यशस्वी होण्यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक व त्यांचे शिक्षक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. या परीक्षेस इंदापूर तालुक्यातील शाळा मधून इयत्ता तिसरी साठी १९८० व इयत्ता ४ थी साठी २१०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा भविष्यात शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय व सातारा सैनिक स्कूल परीक्षेची पायाभूत तयारी इयत्ता तिसरी व चौथी मध्ये व्हावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. 

या परीक्षेकामी केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, केंद्र समन्वयक व शिक्षकानी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडून खूप सहकार्य केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.