मुलाच्या वाढदिवसा निमीत्त शाळेतील मुलांना शिक्षकाकडून पुस्तके वाटप.
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून मुलांना श्रेयशी प्रकाशनची दर्जेदार पुस्तकांचे वाटप.
दि.५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे कार्यरत असणारे उपशिक्षक तथा शिक्षक समिती इंदापूर कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी चि. शुभम याचा वाढदिवस शाळेतील ६१ मुलांना श्रेयशी प्रकाशनचे उन्हाळी अभ्यास हे पुस्तक देवून साजरा केला. हे पुस्तक चालू इयत्ता व नवीन इयत्तेची पुर्व तयारीसाठी चांगले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री साहेबराव पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य श्री आण्णा काळेल,मुख्याध्यापक श्री नंदकुमार सूर्यवंशी,उपशिक्षिका आरती गायकवाड यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पालक, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व मुलांनी चि.शुभम यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा