पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूरातील एका ध्येय वेड्या माणसाची यशोगाथा, त्याने रचला वेगळाच इतिहास: भजनदास पवार.

इमेज
ऑक्सिजन पार्क, संरक्षित गवताळ प्रदेश: पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रातील एका छोट्या गावाचे प्रयत्न.   गावकऱ्यांचे प्रयत्न वंशजांसाठी निरोगी घर . ३० एकरमध्ये दोन हजार वृक्षारोपण करून संगोपन यशस्वी करणारं नेतृत्व म्हणजे वृक्षप्रेमी भजनदास पवार (सर).   इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.  गावाच्या सभोवतालच्या गवताळ प्रदेशात जलसंधारण संरचना तयार केल्या आहेत.  गावाच्या आजूबाजूच्या गवताळ प्रदेशात जलसंधारणाची मोठी कामे करून एक देशाच्या समोर इतिहास रचणारे भजनदास पवार यांचा एक प्रयत्न.  महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कडबनवाडी हे छोटेसे गाव हिरवाईने वेढलेले असले तरी पाऊस फारच कमी पडतो. येथील रहिवाशांनी अनेक दशकांपासून पाण्याच्या टंचाईशी लढा दिला आहे आणि समस्या दूर करण्यासाठी आणि वंशजांसाठी निरोगी निवासस्थान मागे ठेवण्यासाठी प्रदेशातील पर्यावरणीय संसाधनांच्या सामुदायिक संवर्धनाकडे वळले आहे.  कडबनवाडी म्हणजे ‘जंगलाने वेढलेली जागा’. 500-हेक्टर गवताळ प्रदेशाचा एक भाग गावात पसरतो, ज्यामध्ये कडुनिंब, बाबुल आणि बेरची झाडे आहेत. हे भारतीय लांडगा आणि भारतीय गझेल ...

ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप ;उदयसिंह आत्माराम पाटील.

इमेज
ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप ;उदयसिंह आत्माराम पाटील. इंदापूर (दि) प्रतिनिधि;महेश गडदे. 'मा.श्री शरदचंद्रजी पवारसाहेब माजी केंद्रीय कृषिमंत्री भारत सरकार यांच्या वाढदिवसा निमित्त श्री बाबीर विद्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री उदयसिंह आत्माराम पाटील यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप केले.  नविन कपडे मिळाल्यानंतर त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले ते हास्य पाहून मिळालेला आत्मीक समाधान हे कोणत्या इतर कार्यात नाही. ते अनुभवल्याशिवाय कळत नाही असा कौतुकास्पद उपक्रम उदयसिंह पाटील यांनी राबवला, यावेळी तुकाराम मारकड,बापू मदने,नवनाथ मारकड,रणजित माने व अन्य सहकारी उपस्थित होते,

श्री. बाबीर विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप .

इमेज
 श्री.बाबीर विद्यालय-रुई येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप . प्रतिनिधि:महेश गडदे.  आज श्री बाबीर विद्यालय, रुई ता.इंदापूर येथे देशाचे माजी कृषिमंत्री मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक12/12/2022 क्रीडा सप्ताहाचा समारोप खेळाच्या मैदानातच करण्यात आला .   खो-खो या खेळामध्ये मोठ्या गटात इयत्ता .8 वी ते 10 वी गटात प्रथम आलेल्या, 9 वी मधील मुलांच्या संघाला बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह आत्माराम पाटील व गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचे शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.    या वेळी माजी सरपंच मिरादेवी पाटील,प्रतीक्षा पाटील,व सर्वच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.   अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली.  क्रीडा सामन्याचे नियोजन क्रीडा शिक्षक गौतम सोनवणे व आप्पासो डोंबाळे यांनी केले.पंच म्हणून धनेश भोईर,यशवंत लोंढे यांनी तर या सामन्याचे समालोचन बादशाह मुलाणी यांनी केले.   वरील सर्व स्पर...

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग केले सादर

इमेज
  जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग केले सादर. प्रतिनिधी (दि) महेश गडदे. जादूच्या प्रयोगांमुळे विध्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो....नंदकुमार सूर्यवंशी(मुख्याध्यापक जि प शाळा कौठळी) दिनांक २/१२/२०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग सादर केले.जादूगार येणार आहे हे माहीत असल्याने आज सर्व मुले शाळेत नेहमी पेक्षा लवकर उपस्थित... सकाळपासून त्यांना जादूगार कधी येणार याची आतुरता होती...जादूगार दुपारी शाळेच्या मैदानावर दिसताच मुलांनी जादूगार-जादूगार असा जल्लोष केला.जादूगार शक्तीकुमार यांनी देखील मुलांचे खूप मनोरंजन केले.जादू दाखवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक सामाजिक संदेश दिले त्यामध्ये प्राणिमात्रांवर दया करा,आई वडिलांना सांभाळा, वृक्षतोड करू नका,अंधश्रद्धा बाळगू नका,खोटे बोलु नये, यासह जादूच्या प्रयोगातून गणित, विज्ञान यांच्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या .मुलांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन मुलांना खूप हसवले.हसण्याचे फायदे सांगितले.जादूचे प्रयोग पाहण्यासाठी शाळेचे मु...