जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग केले सादर

 जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग केले सादर.


प्रतिनिधी (दि) महेश गडदे.

जादूच्या प्रयोगांमुळे विध्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो....नंदकुमार सूर्यवंशी(मुख्याध्यापक जि प शाळा कौठळी)

दिनांक २/१२/२०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे जादूगार शक्तीकुमार यांनी जादूचे प्रयोग सादर केले.जादूगार येणार आहे हे माहीत असल्याने आज सर्व मुले शाळेत नेहमी पेक्षा लवकर उपस्थित... सकाळपासून त्यांना जादूगार कधी येणार याची आतुरता होती...जादूगार दुपारी शाळेच्या मैदानावर दिसताच मुलांनी जादूगार-जादूगार असा जल्लोष केला.जादूगार शक्तीकुमार यांनी देखील मुलांचे खूप मनोरंजन केले.जादू दाखवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक सामाजिक संदेश दिले त्यामध्ये प्राणिमात्रांवर दया करा,आई वडिलांना सांभाळा, वृक्षतोड करू नका,अंधश्रद्धा बाळगू नका,खोटे बोलु नये, यासह जादूच्या प्रयोगातून गणित, विज्ञान यांच्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या .मुलांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन मुलांना खूप हसवले.हसण्याचे फायदे सांगितले.जादूचे प्रयोग पाहण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.आरती गायकवाड यांनी स्वागत केले तर भारत ननवरे यांनी जादूगार व उपस्थित पालक, ग्रामस्थांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.