पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.

इमेज
  जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी. इंदापूर(दि) प्रतिनिधी: महेश गडदे. "स्त्री शिक्षणाचे जनक व छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणारे,पहिले शिवशाहिर,तृतीयरत्न नाटक लिहणारे आद्यनाटककार क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन शैक्षणिक कार्यासह समतेच्या सामाजिक व वैचारिक क्रांतीला मानाचा मुजरा..! दिनांक २८ नोव्हेंबर २०२२  रोजी जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.नंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड मॅडम यांनी मुलांना महात्मा फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.नंतर मुलांनी आपले विचार व्यक्त केले.महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यशस्वी मुलांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, उपशिक्षक भारत ननवरे,आरती गायकवाड यांनी केले.

इंदापूर तालुका कला क्रीडा महोत्सव उत्साहात-अठराशे विद्यार्थी सहभागी.

इमेज
  इंदापूर तालुका कला क्रीडा महोत्सव उत्साहात-अठराशे विद्यार्थी सहभागी. इंदापूर प्रतिनिधी: महेश गडदे. निमगाव केतकी-पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे केले होते.या महोत्सवात ११ प्रकारच्या कला क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे अठराशे विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी अभिनंदन केले आहे.          कलाक्रीडा महोत्सव शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुगळे,चिमाजी       कोकणे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे,मारुती सुपुते,भिवाजी हगारे,हनुमंत शिंदे,हनुमंत देवकाते,हरिश्चंद्र गाढवे,सुनिता कदम,प्राचार्य आर डी चव्हाण यांचेसह विषयतज्ञ,शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुत्रसंचालन किरण म्हेत्रे यांनी केले.स्पर्धेसाठी माध्यमिक शिक्षक,प्राथमि...

अतिक्रमण काढण्याचा निर्णय थांबवा , अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन.

इमेज
अतिक्रमण काढण्याचा निर्णय थांबवा , अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन. इंदापूर (दि) प्रतिनिधी:महेश गडदे .  दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील २ लाख २३ हजार अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे राज्यातील गोरगरिबांना फार मोठा फटका बसणार आहे तरी या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे या मागणीसाठी मा. श्री. नायब तहसीलदार इंदापूर अनिल ठोंबरे साहेब यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जर या मागणीचा विचार न केल्यास भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष तानाजी मारकड यांनी दिला यावेळी मा. श्री. तानाजी मारकड इंदापूर तालुका अध्यक्ष,मा.श्री.सतीश शिंगाडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मा.श्री.गणेश हेगडकर सोशल मीडिया अध्यक्ष इंदापूर, श्री.श्रीनिवास सातपुते इंदापूर शहराध्यक्ष, मा.अण्णा पाटील, अविनाश मोहिते युवक नेते, नवनाथ कोळेकर, तात्याराम मारकड, सोन्या जानकर युवक आघाड़ी उपाध्यक्ष, अतुल शिंगाडे संघटक युवक आघा...

बाबीर विद्यालयात रुई येथे इ.बी.सी शिबिर संपन्न

इमेज
  बाबीर विद्यालयात रुई येथे  इ.बी.सी शिबिर संपन्न. इंदापूर प्रतिनिधी: महेश गडदे.     पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23साठीचा इ.5 वी ते 10 वी आणि 11 वी 12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थांना निःशुल्क मोफत शिक्षण सवलत (इबीसी)चे शिबिर रुई(ता.इंदापूर)येथील  श्री बाबीर विद्यालयात संपन्न झाले.इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी श्री बाबीर विद्यालय, रुई येथे शिबीर दिनांक 17 व 18नोव्हेंबर असे दोन दिवस घेण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील 62 शाळांनी इबीसी प्रस्ताव सादर केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम  यांचे आदेशान्वये व वरिष्ठ लिपिक  श्रीमती छाया कराळे मॅडम  यांचे मार्गदर्शनाखाली शिबीर झाले.इंदापूर तालुका शिक्षेकेत्तर संघटनेचे तालुका सचिव दत्तात्रय काळे, निमसाखरचे बरकत डांगे, कौठळीचे मिसाळ , वरकुटे खुर्दचे शिंदे,निमगावचे देवकर, काटीचे कुबेर, कळसचे मोरे,लाकडीचे चव्हाण यांनी दोन दिवस शिबिराचे काम पाहिले.    या शिबिराचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व...

निमगाव केतकी येथील केतकेश्वर विद्यालयात शिक्षक क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न

इमेज
  निमगाव केतकी येथील केतकेश्वर विद्यालयात शिक्षक क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न सीवायडीए व प्राज फाऊंडेशनचा प्रकल्प शिक्षण क्षेत्रास लाभदायी-विजयकुमार परीट इंदापूर (दि) प्रतिनिधी: महेश गडदे. निमगाव केतकी- सीवायडीए, प्राज फाऊंडेशन व पंचायत समिती इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित,शिक्षक क्षमता विकसन कार्यशाळेचा लाभ इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार असल्याचे मत इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रशिक्षण प्रसंगी व्यक्त केले.             सीवायडीए ही संस्था मागील वर्षापासून इंदापूर तालुक्यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी काम करत असुन संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थी,पालक व शिक्षक  यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील ५१ शाळांमधून २२०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय व जुनियर काॕलेज मध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील ५१ शाळांमधील १०२ शिक्षकांना मुंबई येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व तज्ञ मार्ग...

कला,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते; सुनील मुगळे-विस्तार अधिकारी

इमेज
  यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव व्याहाळी केंद्रात उत्साहात साजरा.   कला,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते...श्री सुनील मुगळे साहेब-विस्तार अधिकारी निमगाव केतकी बिट इंदापूर (दि)प्रतिनिधी: महेश गडदे. कला,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण समजून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे मार्गदर्शन करणे सोपे जाते-श्री संभाजी आजबे साहेब(केंद्रप्रमुख... केंद्र- व्याहाळी) दिनांक १६/११/२०२२ रोजी व्याहाळी केंद्राचा केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा महोत्सव जि प प्राथमिक शाळा व्याहाळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक चंद्रकांत रामाने व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पार पडले.नंतर राजकुमार भोंग सरांनी क्रीडा व कला प्रकार, नियम,अटी,गट सांगून उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा प्रकार व विजेते.लहान गट.(इयत्ता १ ते ५) धावणे ५० मी.(मुले) १)रुद्राक्ष भोंगळे..पोंदकुलवाडी २)गौरव मोरे..कौठळी ३)स्वराज तनपुरे.. तनपुरेवाडी धावणे ५० मी.(मुली) १)सई पांडवे...व्याहाळी २)चित्रा जाधव..मा...