अतिक्रमण काढण्याचा निर्णय थांबवा , अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन.


अतिक्रमण काढण्याचा निर्णय थांबवा , अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन.


इंदापूर (दि) प्रतिनिधी:महेश गडदे.

 दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील २ लाख २३ हजार अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे राज्यातील गोरगरिबांना फार मोठा फटका बसणार आहे तरी या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे या मागणीसाठी मा. श्री. नायब तहसीलदार इंदापूर अनिल ठोंबरे साहेब यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जर या मागणीचा विचार न केल्यास भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष तानाजी मारकड यांनी दिला यावेळी मा. श्री. तानाजी मारकड इंदापूर तालुका अध्यक्ष,मा.श्री.सतीश शिंगाडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मा.श्री.गणेश हेगडकर सोशल मीडिया अध्यक्ष इंदापूर, श्री.श्रीनिवास सातपुते इंदापूर शहराध्यक्ष, मा.अण्णा पाटील, अविनाश मोहिते युवक नेते, नवनाथ कोळेकर, तात्याराम मारकड, सोन्या जानकर युवक आघाड़ी उपाध्यक्ष, अतुल शिंगाडे संघटक युवक आघाडी असे आदी कार्यकर्ते उपस्थित होते


मला निवेदन देण्यासाठी येण्याची ईच्छा होती , परंतु हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे नाही येता आले युवक आघाडी इंदापूर चे पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.