जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.

 जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.


इंदापूर(दि) प्रतिनिधी: महेश गडदे.

"स्त्री शिक्षणाचे जनक व छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणारे,पहिले शिवशाहिर,तृतीयरत्न नाटक लिहणारे आद्यनाटककार क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन शैक्षणिक कार्यासह समतेच्या सामाजिक व वैचारिक क्रांतीला मानाचा मुजरा..!


दिनांक २८ नोव्हेंबर २०२२  रोजी जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.नंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड मॅडम यांनी मुलांना महात्मा फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.नंतर मुलांनी आपले विचार व्यक्त केले.महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यशस्वी मुलांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, उपशिक्षक भारत ननवरे,आरती गायकवाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा