इंदापूर तालुका कला क्रीडा महोत्सव उत्साहात-अठराशे विद्यार्थी सहभागी.
इंदापूर तालुका कला क्रीडा महोत्सव उत्साहात-अठराशे विद्यार्थी सहभागी.
इंदापूर प्रतिनिधी: महेश गडदे.
निमगाव केतकी-पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे केले होते.या महोत्सवात ११ प्रकारच्या कला क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे अठराशे विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी अभिनंदन केले आहे.
कलाक्रीडा महोत्सव शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुगळे,चिमाजी कोकणे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे,मारुती सुपुते,भिवाजी हगारे,हनुमंत शिंदे,हनुमंत देवकाते,हरिश्चंद्र गाढवे,सुनिता कदम,प्राचार्य आर डी चव्हाण यांचेसह विषयतज्ञ,शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुत्रसंचालन किरण म्हेत्रे यांनी केले.स्पर्धेसाठी माध्यमिक शिक्षक,प्राथमिक शिक्षक यांचेसह सचिन गायकवाड व दत्तात्रय शिंगाडे यांनी विशेष सहकार्य केले.
स्पर्धेसाठी लहान गट इयत्ता १ ते ५ व मोठा गट इयत्ता ६ ते ८ या साठी होता.स्पर्धानिहाय गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक निकाल व शाळा पुढीलप्रमाणे
१)धावणे-लहान गट मुले-यश भालसिंग ठवरेवस्ती,यशराज डोळे कुंभारगाव,श्रेयश राऊत राऊतवाडी मुली-जान्हवी माने वायसेवाडी,मनिषा निकम शहा,श्रावणी रसाळ डाळज मोठा गट मुले-आदित्य पवार भिगवण,प्रेम चव्हाण लालपुरी,इंद्रजित माने व्याहाळी मुली- स्नेहल दराडे वायसेवाडी,कादंबरी मकर लाकडी,भाग्यश्री खारतोडे कुंभारगाव २)उंचउडी लहानगट मुले- अभिषेक कुंभार लाकडी,श्रेयश राऊत राऊतवाडी,विशाल नगरे कुंभारगाव मुली- जान्हवी माने वायसेवाडी,सृष्टी शिंदे कदमवस्ती,सानिका बेनकुळे अगोती नं.१ मोठा गट मुले-इंद्रजित माने व्याहाळी,श्रेयश झगडे काझड,आकाश चव्हाण बारामती अॕग्रो मुली- भाग्यश्री खारतोडे कुंभारगाव,वैष्णवी वणवे लाकडी,सृष्टी लकडे निरगुडे ३)लांबउडी लहानगट मुले- यश भालसिंग ठवरेवस्ती,साईराज वणवे लाकडी,विशाल नगरे कुंभारगाव मुली- श्रेया नरुटे पिंपरी खुर्द,सानिका भोंग कौठीमळा,आकांक्षा परब वायसेवाडी *मोठागट मुले- प्रेम चव्हाण लालपुरी,आदित्य पवार भिगवण,इंद्रजित माने व्याहाळी मुली- संध्या देवकाते मदनवाडी,श्रुती शिंदे काझड,गौरी पडळकर वायसेवाडी ४)गोळाफेक मोठागट मुले- आसिफ काझी लुमेवाडी,शिवराजे धुमाळ भिगवण,रेवण शिंदे काझड मुली- वैष्णवी वणवे लाकडी,कार्तिकी थोरवे म्हसोबावाडी,भाग्यश्री खारतोडे कुंभारगाव ५)थाळीफेक मोठागट मुले- श्रेयश भोई कुंभारगाव,आदित्य वणवे लाकडी,जयदिप सुबनावळ वायसेवाडी मुली- हर्षदा बनगर भिगवण,वैष्णवी वणवे लाकडी,कार्तिकी थोरवे म्हसोबावाडी ६)खो खो लहानगट मुले- शाळा वायसेवाडी,मराडवाडी,काझड मुली- वायसेवाडी,शिंदेवस्ती,अशोकनगर मोठा गट मुले- वायसेवाडी,भिगवण,खोरोची मुली-वायसेवाडी,काझड,डाळज नं.१ ७)कबड्डी मोठागट मुले- लुमेवाडी,लाकडी,डाळज नं.१ मुली- कुंभारगाव,लाकडी,शहा ८)लेझीम लहानगट मुले- अंथुर्णे,भिगवण,इंदापूर नं.५ मुली- कळंब,सरस्वतीनगर,अंथुर्णे मोठागट मुले- भिगवण मुली- भिगवण,लाकडी,व्याहाळी ९)लोकनृत्य लहानगट मुले- काझड,माळीवास्ती,कांदलगाव १०)भजन लहानगट- सरस्वतीनगर,चव्हाणवस्ती,व्याहाळी मोठा गट- भिगवण,निरगुडे,लाकडी ११)वक्तृत्वस्पर्धा लहानगट -दिव्या काशिद भिगवण,आराध्या दराडे अशोकनगर,मुग्धा कणसे माळीवस्ती मोठागट- श्रद्धा आंभुरे भिगवण,गौरी पडळकर वायसेवाडी,प्रांजली वाघमोडे लालपुरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा