श्री संत तुकाराम महाराज पालखी स्वागतासाठी इंदापूर नगरी सज्ज.
अवघा वैष्णवांचा मेळा "तुका निघाले विठ्ठलाच्या भेटीला "
प्रतिनिधी: महेश गडदे.
इंदापूर.ता.२८: आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची तयारी जवळ जवळ पुर्ण झाले आहे. आ.दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या मार्गदर्शक सूचने नुसार तसेच तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, डॉ. सुरेखा पोळ, संतोष बाबर यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, औषधे उपचार मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मार्गावरील विविध ग्रामपंचायत, हॉटेल्स, खाजगी दवाखाने यांना लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगाव अंतर्गत तातडीची वैद्यकीय सुविधा, पुरेसा औषध साठा, बाह्य व आंतररुग्ण विभाग, रुग्णवाहिका इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नऊ पथके तयार.
एकूण नऊ पथके तयार करण्यात आली असून याठिकाणी शांताराम काशीद, देवेंद्र उत्तेकर, शंकर जगताप, बनसिद्ध कुंभार, गिरीश जगताप, आशिष कोळेकर, श्रीम.रेणुका जाधव, श्रीम.शालन नवले, श्रीम.कल्पना बुधावले या स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ.सुश्रुत श्रेणिक शहा, प्रभारी वैद्यकीय अधिकारी.
पालखी मार्गावरील टँकर मधील पाण्याचे नमुने तपासताना वैद्यकीय पथक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा