ग्राहक पंचायतच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी महेश गडदे यांची निवड.
ग्राहक पंचायतने भविष्यात लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करावीत;निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब खराडे.
ग्राहक पंचायतच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी महेश गडदे यांची निवड.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे व इतर मान्यवर महेश गडदे यांचा सन्मान करताना.
इंदापूर.दि.०८: तीर्थक्षेत्र श्री रांजणगाव महागणपती सभागृहात दि.५ फेब्रुवारी रोजी ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्यव्यापी नवीन संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचारांची पालखी पुढे चालावी म्हणून त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे व जनार्दन पांढरमिसे यांनी समाजातील घटकांची जान असलेल्या सहकार्याना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व शोषणमुक्त करण्यासाठी ग्राहक पंचायत ही संस्था स्थापन केली आहे.
या निमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, शिरुर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिक्रापूरचे नितीन महाजन, शाखा अभियंता पाचुंदकर, रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष अशोक भोरडे, ग्राहक पंचायत पुणेचे उपाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे यांच्या हस्ते ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड, वनपरिक्षेत्र शिक्रापूरचे प्रताप जगताप, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिक्रापूरचे अरुन साकोरे हे मान्यवरांनी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ग्राहक पंचायतच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी महेश गडदे यांना देण्यात आली. या कार्यक्रमाला पुणे, शिरुर, हवेली, खेड, दौंड, इंदापूर, या भागातून ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
चौकट:- गोरगरीब जनतेसाठी ग्राहक पंचायतने अनेक मोलाची कामगिरी केली आहे. तसेच भविष्यात लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करून समाज शोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे काम करावे.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा