इंदापूर: नंदिकेश्वर विद्यालयात कला शिक्षकांची कार्यशाळा, ४० विध्यालयांनी घेतला सहभाग .


नंदिकेश्वर विद्यालयात कला शिक्षकांची कार्यशाळा, ४० विध्यालयांनी घेतला सहभाग.


इंदापूर (प्रतिनिधी- महेश गडदे)ता. १३: श्री नंदिकेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज जंक्शन येथे शासकीय रेखाकला परीक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंत (आबा) मोहोळकर होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भरत बोराटे होते. यावेळी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव जगन्नाथ पाटील, लासुणे॔ हायस्कूलचे प्राचार्य प्रविण लोंढे, नंदकिशोर चे प्राचार्य चंद्रकांत सोळसे, जिल्हा कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे, पुरंदर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष योगेश घोरपडे, बारामती तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन कदम वरील सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यशाळा संपन्न झाली तालुक्यातून जवळजवळ 40 शाळांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन सचिन कदम आणि त्यांचे विद्यार्थी यांनी डेमोस्ट्रेशन करून दाखवले आणि यामध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत हे सविस्तर सांगितले, राजू वाघमारे यांनी आपल्या सुरेल गीतातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी उत्कृष्ट प्रकारे केले तर प्रस्ताविक इंदापूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष अमीन मुल्ला यांनी केली आणि आभार परबती करे यांनी मानले.
तालुका कलाशिक्षकांना, शिक्षक संघ कार्यकारिणी निवडीचे पत्र.

वर्धमान विद्यालयाचे प्रमोद गायकवाड, पूर्व विभागातून उपाध्यक्ष. उदमाई विद्यालय घोलपवाडीचे सुखदेव जाधव, पश्र्चिम भागातून उपाध्यक्ष. श्री छत्रपती हायस्कूल सणसरचे परशुराम घाडगे, सचिव. नीलकंठेश्वर विद्यालयाचे दीपक शिंदे, कार्याध्यक्ष. जंक्शन येथीलचे प्रदीप कुमार शिंदे, खजिनदार. केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकीचे सोमनाथ शिंदे, सहसचिव. एस बी पाटील पब्लिक स्कूल बावडाचे शरद दळवी, सहकोषाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.