बाबीर विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी बाबीर विद्यालयात उत्साहात संपन्न
रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात भारताचे स्वतंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लोकमान्य टिळक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच विद्यालयाचे संस्थापक कै. आत्माराम बाबुराव पाटील या नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील आणि पर्यवेक्षक तानाजी मराडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी पुणेकर साही, थोरात वैष्णवी, मारकड उत्कर्षां, पाटील यशपाल, डोंबाळे अथर्व, वाबळे विद्या, आणि शिंदे समीक्षा वरील विद्यार्थ्यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी आणि महादेव करे यांनी थोर नेत्यांच्या कार्याविषयी सखोल माहिती देत त्यांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या विभागाचे विभाग प्रमुख यशवंत लोंढे यांनी केले तर आभार दत्तात्रेय जाधव यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा