वाद्यांचा गजर करण्यापेक्षा विचारांचा जागर केला पाहिजे -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.
इंदापूर,भवानीनगर वार्ताहर,(महेश गडदे)ता.३१: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.संजय मोरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी अण्णा भाऊंचे साहित्य व लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती विध्यार्थ्यांना दिली.यावेळी प्रथम वर्ष कला शाखेतील विध्यार्थिनी सोनाली चव्हाण व मोनाली चव्हाण या भगिनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते त्यांनी लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जहालवादाच्या माध्यमातून ब्रिटिशसत्ते विरुद्ध उभारलेला लढा हा भारताच्या इतिहासामध्ये जहालयुग म्हणून ओळखला जातो तसा तो त्यांच्या नावाने म्हणजे टिळक युग या नावाने सुद्धा ओळखला जातो. त्यांच्या या कार्याचा जसा आपणा सर्वांना अभिमान वाटतो तसाच अवघ्या दीड दिवस शाळेत जाऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून तत्कालीन वास्तव परिस्थिवर आसूड ओढून जे परिवर्तनमय कार्य केले आहे. ते एक कलावंत म्हणून खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याची दखल रशियाने घेतली तशी भारताने देखील घेतली आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतेय काहीली या समजप्रबोधनपर गीताच्या माध्यमातून केलेल्या कार्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागली आहे. अशा या दोन महापुरुषांच्या जयंती अन् पुण्यतिथी साजरा करताना त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या तरुणाईने चालवला पाहिजे. जयंती पुण्यतिथीच्या दिवशी वाद्यांचा गजर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले.तर आभार प्रा. प्राच्यू जगताप यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा धुळदेव वाघमोडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब चव्हाण,प्रा.अंकुश लांडगे, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर, इतर प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा