पुणे जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्य पदी तानाजी मारकड यांची निवड.
इंदापूर (महेश गडदे)दि,०३: इंदापूर रुई, चे तानाजी मारकड यांची पुणे जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाली असून, पुणे जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे.या समितीचे सचिव यशवंत मानखेडकर उपसंचालक नेहरू युवा केंद्र पुणे, मुंबई, हे आहेत.
तानाजी मारकड यांनी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, जलसंधारण, युवा संसद, महिला सक्षमीकरण,शेळी मेंढी पालन, सेंद्रिय शेती कार्यशाळा, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची जनजागृती योजनादूत, आरोग्य शिबीरे, आंतरराष्ट्रीय योग,युवादिन, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अशाप्रकारे अनेक विषयांवर तानाजी मारकड यांनी कार्य केले आहे, त्या माध्यमातून त्यांना पुणे जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्यपदी काम करण्याची संधी अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा