समाजसेवी अण्णासाहेब हजारे माझे पांडुरंग ; भजनदास पवार यांनी सांगितली यशोगाथा.
9ऑगस्ट 19 93 ला मी अण्णांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला गेलो होतो त्यावेळेस कृषी खात्याचे उपसंचालक जे.वाय.पाटील आणि पारनेरचे उपविभागीय अधिकारी धुमाळ साहेब अशी तिघांची एकत्र भेट झाली. कडबनवाडी गावाच्या वॉटर शेड विषयी चर्चा झाली आणि अण्णांनी कडबनवाडीला येण्याचे कबूल केले. मग 20 जानेवारी 1994 आण्णा कडबनवाडीचे संपूर्ण वॉटर शेडची पाहणी करण्यासाठी फिरले आणि ग्रामपंचायत च्या समोर एक छोटीशी सभा घेतली. त्या सभेमध्ये गाव कसे असावे,पाणी कसं अडवावे,पाण्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले व गाव राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत बसवण्याचे कबूल केले.
आण्णांना वॉटरशेड खूप आवडले. अण्णा क्रांतिकारक विचाराचे होते महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अण्णांनी सोळा उपोषण केली यामध्ये 450 अधिकाऱ्यांवर कारवाई झाली सहा कॅबिनेट मंत्री निलंबीत झाले. अण्णा एवढी मोठी नैतिक ताकद दुसऱ्या कोणत्याही माणसाकडे नाही असे मला वाटते. माहितीचा अधिकार कायदा असो भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन असो लोकपाल विधेयक असो अशी अनेक मोठी कामे आण्णांनी जनतेसमोर उभी केली.आण्णा आपण महात्मा आहात म्हणूनच कडबनकरांनी 11मार्च 2010 ला आपणास महात्मा ही पदवी देऊन सन्मानित केले. आपल्यामधील महात्मा कडबणकरांनी ओळखला होता.
अण्णा आजही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, लहान पदाधिकारी ते मोठ्या पदाधिकारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत सगळे पैशाशिवाय काम करत नाहीत. पैशातून सत्ता व सत्तेतून पुन्हा पैसा असं चक्र चालू आहे व सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे हे चक्र बंद झाले नाही तर आपली भारतीय लोकशाही धोक्यात येईल.यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणखी सक्षम होणे गरजेचे आहे व त्यासाठी आपण पूर्ण ताकतीने यात लक्ष द्याल अशी राळेगणसिद्धी पांडुरंगाचे चरणी अपेक्षा व्यक्त करतो. या कामांमध्ये आमची तुम्हाला साथ आहेच.
परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आपला हितचिंतक - भजनदास पवार,कडबनवाडी.ता. इंदापूर.जि. पुणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा