समाजसेवी अण्णासाहेब हजारे माझे पांडुरंग ; भजनदास पवार यांनी सांगितली यशोगाथा.
पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री अण्णासाहेब हजारे यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच् हार्दिक शुभेच्छा. पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचा 86 वा वाढदिवस, खरं तर राळेगणसिद्धी ही पंढरी आणि अण्णा हजारे हे पांडुरंग,ज्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या हितासाठी खर्च केले ते जनतेचे आदरणीय असतात. आज मला आण्णांविषयी लिहावसं वाटलं म्हणून थोडसं लिहीत आहे. 9ऑगस्ट 19 93 ला मी अण्णांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला गेलो होतो त्यावेळेस कृषी खात्याचे उपसंचालक जे.वाय.पाटील आणि पारनेरचे उपविभागीय अधिकारी धुमाळ साहेब अशी तिघांची एकत्र भेट झाली. कडबनवाडी गावाच्या वॉटर शेड विषयी चर्चा झाली आणि अण्णांनी कडबनवाडीला येण्याचे कबूल केले. मग 20 जानेवारी 1994 आण्णा कडबनवाडीचे संपूर्ण वॉटर शेडची पाहणी करण्यासाठी फिरले आणि ग्रामपंचायत च्या समोर एक छोटीशी सभा घेतली. त्या सभेमध्ये गाव कसे असावे,पाणी कसं अडवावे,पाण्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले व गाव राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत बसवण्याचे कबूल केले. आण्णांना वॉटरशेड खूप आवडले. अण्णा क्रांतिकारक विचाराचे होते महार...