कर्मयोगी कारखान्याने उसाची संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन ; रासपाचा इशारा.
कर्मयोगी कारखान्याने उसाची संपूर्ण एफ आर पी द्यावी अन्यथा आंदोलन ; रासपाचा इशारा.
इंदापूर (दि:२१) प्रतिनिधी:महेश गडदे.
राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना येथे संपूर्ण एफ आर पी ची रक्कम एक ऑक्टोबर 2022 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यासाठी कारखाना प्रशासनास पत्र देण्यात आले यावेळी बोलताना रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने म्हणाले की कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ऊस बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक करत आलेला आहे .
गेले तीन वर्षे एकदाही वेळेत एफआरपीची रक्कम या कारखाने दिलेली नाही जर वर्षी दोन-तीन मस्टरचे बिल रेगुलर काढायचे यावर्षी कारखाना व्यवस्थित दर देतोय आस भासावयचे आणि कारखान्यास ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचं आणि त्यानंतर उरलेल्या चार महिन्याचे बिल मात्र सहा सहा महिने रखडून ठेवायचं हे धोरण या संचालक मंडळाने आतापर्यंत राबवलेला आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर बारामती ऍग्रो या साखर कारखान्यांच्या तोडीचा दर सदर कारखान्यात दिला नाही.
नेहमीच 400 ते 500 रुपयांचा फरक या दोन्ही कारखान्यांचे बिलांमध्ये राहिलेला आहे आज पर्यंत शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान यांनी केलेले आहे आणि बिल जमा करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना बिल सोमवारी जमा होईल बँकेत पैसे येऊन पडलेत गुरुवारी जमा होईल पंधरा दिवसात जमा होईल असे कारणे देऊन शेतकऱ्यांना वारंवार फसवण्यात आले आहे.
यांच्या या धोरणामुळे शेतकरी तालुक्यातील खाजगी सावकारांना बळी पडलेले आहेत शेतकऱ्यांची बाजारामध्ये पत उरलेली नाही मध्यंतरी एका करमाळ्यातील शेतकऱ्याचा रडत असतानाचा व्हिडिओ सबंध महाराष्ट्राने पाहिला त्यात तो म्हणायचा पाच हजार रुपयासाठी माझा बाप मेला मला फक्त पाच हजार रुपये द्या असे कारखान्याकडे तो विनवणी करत होता अशाच प्रकारचे अवस्था अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेले असून याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष एक ऑक्टोबर पर्यंत दररोज प्रत्येक गावामध्ये जाऊन या कारखान्याच्या धोरणाच्या विरोधात आंदोलनात सामील होण्यासाठी जनतेला साथ घालणार आहे व शेतकऱ्यांना त्यांच्या फरकासह व्याजाचे रक्कम मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणार आहे आणि तरीसुद्धा कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची मागणी मान्य केले नाही तर एक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता इंदापूर बायपास येतील मालोजीराजे चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी शिंगाडे युवक आघाडीचे आकाश पवार इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा