बारामती लोकसभा ताकतीने लढवणार महादेव जानकर.
बारामती लोकसभा ताकतीने लढवणार;महादेव जानकर.
इंदापूर येथे बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम इंदापूर येथील हॉटेल स्वामीराज येथे संपन्न झाला या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वन बूथ टेन युथ या संकल्पनेनुसार पक्षाचे विस्तार वाढ प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते पुढे म्हणाले आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वभावावर लढविण्याच्या हेतूने रासपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ वर दहा दहा माणसे तयार केले पाहिजेत त्या दृष्टीने महत्त्वाचे कानमंत्र जानकर यांनी कार्यकर्त्यांना दिले.
सदर कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे ,पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने, पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे, ज्येष्ठ नेते विनोदराव पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी मारकड तालुका अध्यक्ष, सतीश तरंगे, तानाजी शिंगाडे, बजरंग वाघमोडे, मनीष जाधव, शहाजी बाळे, नवनाथ कोळेकर, आदींसह गावोगावीचे पक्षाचे बुथ प्रमुख उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा