रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आमदार फंडातून श्री बाबीर मंदिर येथे पाण्याच्या टाकीसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आमदार फंडातून श्री बाबीर मंदिर येथे पाण्याच्या टाकीसाठी दहा लाख रुपये निधी मंजूर.


बातमीदार :महेश गडदे.

 श्री क्षेत्र बाबीरबुवा देवस्थान रूई तालुका-इंदापूर जिल्हा-पुणे, महाराष्ट्र, येथे 'राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, 'महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार महादेवरावजी जानकरसाहेब यांच्या आमदार फंडातून श्री क्षेत्र बाबीरबुवा देवस्थान येथे भाविक भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे,

 त्या कामांचा भुमीपुजन समारंभ आज दि.१५/७/२०२२ रोजी ५ वा 'राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे,रासप नेते तानाजी शिंगाडे,रूई गावचे सरपंच यशवंत कचरे,बाबीर देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन न्यास इंदापूर तालुका अध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, पुणे जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी सरचिटणीस तानाजी मारकड, विधानसभा उपाध्यक्ष अविनाश मोहिते, राष्ट्रीय समाज पक्ष शाखा रूईचे कार्याध्यक्ष अमोल भुजबळ,या मान्यवरांच्या शुभहस्ते १० लाख रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे बाबीर देवस्थान मंदिर परिसरात भुमिपुजन झाले,

 यावेळी आज २४ तासचे रिपोर्टर पत्रकार महेश गडदे, बांधकाम व्यावसायिक नाना जाधव,उपस्थित होते,अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी पुणे जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड यांनी दिली,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.