रुई येथील बाबीर केंद्राचा रेखाकला परीक्षेचा निकाल जाहीर.
रुई येथील बाबीर केंद्राचा रेखाकला परीक्षेचा निकाल जाहीर.
प्रतिनिधी: महेश गडदे
श्री बाबीर विद्यालय,रुई ता.इंदापूर या केंद्रात शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आल्या या परीक्षेत रुई केंद्रातून एलिमेंटरी साठी 66 विद्यार्थी प्रविष्ट झाले यामध्ये 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ,यामध्ये A श्रेणीत 03 व B श्रेणीत 07 विशेष प्राविण्य मिळवत पास झाले या परीक्षेचा केंद्राचा निकाल-98:5 %लागला आहे.तर इंटरमिजीएट परीक्षेस 95 विद्यार्थी प्रविष्ट झाली पैकी 86 उत्तीर्ण झाले.यामध्ये A श्रेणीत 03 आणि B श्रेणीत 08 विद्यार्थांनी विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.
बाबीर विद्यालयाने या दोन्ही परिक्षेमध्ये उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लावला आहे.इंटरमिजीएट परीक्षेत *चि. निकेतन दत्तात्रय काळे ,कु.मेघना बाळू शिंदे,कु.अंकिता अशोक लवटे* या विद्यार्थांनी *B* श्रेणी मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे.इतर सर्व विद्यार्थ्यांना *C* श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.वरील इंटरमिजीएटचे विद्यार्थी हे चालू वर्षी इ. 10वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत त्यांना A श्रेणीसाठी अतिरिक्त 7 गुण,B श्रेणीसाठी 5 गुण आणि C श्रेणीसाठी 3 गुण असा विद्यार्थांना फायदा होणार आहे.
एलिमेंटरी परीक्षेत *चि.हरिष दीपक डोंबाळे* या विद्यार्थास विशेष प्राविण्य मिळवत *A* श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.तसेच *कु.सिद्धी संतोष बोराटे हिला B श्रेणी मिळवत विशेष प्राविण्य मिळाले आहे*. आणि इतर सर्व विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व कलाशिक्षक अमीन मुल्ला यांनी दिली.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचेव त्यांना मार्गाशन करणारे कलाशिक्षक अमीन मुल्ला यांचे संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,सचिव विश्वजित करे, मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील ,पर्यवेक्षक तानाजी मराडे सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा