इंदापुरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सभासद सहकार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
इंदापुरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सभासद सहकार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
हॉटेल स्वामीराज सभागृहात सेकंडरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांनो तुम्ही किर्तीवंत व्हा :- चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे, (ता.५) :- आपले पालक शाळेत अध्यापनाचे पवित्र काम करतात, त्यांना पालक म्हणून तुम्हाला वेळ देता येत नाही,परंतु तुम्हाला घडविणारे शिक्षक तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. पाल्यानों तुम्ही शिक्षण घेत असताना आपल्या पालकांचा सन्मान व्हावा असेच वर्तन करावं,तुम्ही गुणवंत आहातच पण किर्तीवंत व्हा असे गौरवोद्गार मुंबई पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी काढले.
ते सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
पाटील म्हणाले की, पतसंस्थेचं राज्यभर जाळं विस्तारलेलं असून २२ शाखा असून सभासद ३२ हजार पेक्षा अधिक आहे . इंदापूरला २०१६- १७ साली शाखा सुरु केली असून १ हजारच्या वर सभासद झाले आहे. ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी अनेक विधायक योजना राबवल्या जातात. शिष्यवृत्ती योजना, जीवन सुरक्षा योजना,कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार योजना, गृह प्रकल्प योजना, गुणवंत गुणगौरव इ. उपक्रम राबवविले जातात. सामान्य सभासदांच्या हितासाठी पतसंस्था आदर्शवत काम करत आहे. पतसंस्था सभासदांना ठेवीवर आकर्षक व्याज, अल्प दरात विना कष्ट कर्ज उपलब्ध करून देते.तसेच पतसंस्था सभासदांचा मौल्यवान वेळ वाचावा यासाठी आरटीजीएस एनईएफटी सुविधा, मोबाईल ॲप आदी सुविधा आणण्याच्या विचाराधीन आहे.आपली पतसंस्था ही डिजिटल युगात आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असल्याचे यावेळी बोलताना पाटील सर म्हणाले.
हॉटेल स्वामीराज सभागृहात दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. वाघमारे सरांनी आपल्या सुरेल आणि मधुर आवाजातून गीत गायनाने उपस्थितांची मनं जिंकली.
यावेळी सुभाष गायकवाड,रामराव पाडुळे,शरद झोळ,नानासाहेब सानप, बंडु जाधव यांची भाषणं झाली.
यावेळी पतसंस्थेचे सहकार तज्ञ संचालक जे.आर पाटील,सहसचिव सतीश माने, प्रमोद देशमुख , जगन्नाथ जाधव, सचिन नलावडे, तुकाराम बेनके ,पालक गाढवे सर, काळे मॅडम, कवडे मॅडम आदी पालक सभासद कार्यक्रमास बहु संख्येने उपस्थित होते .यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा गुलाबपुष्प, प्रवासी बॅग, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार झाला. नवनिर्वाचित संचालक मंडळाचा इंदापूरकरांनी यथोचित सत्कार केला.यावेळी सभासदांचा देखील संचालक मंडळाने सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी केले सूत्रसंचालन विठ्ठल गुरगुडे तर आभार पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी इंदापूर शाखेच्या शाखाधिकारी वैशाली जाधव, इंद्रजित राखुंडे,शेखर आहिरेकर यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा