सेवानिवृत्त कर्मचारी - ऑफ लाईन वेतन देयक शिबीर
सेवानिवृत्त कर्मचारी - ऑफ लाईन वेतन देयक शिबीर .
नूतन माध्यमिक विद्यालय कौठळी येथे संपन्न.
प्रतिनिधी;महेश गडदे.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांना ७वा वेतन आयॊग १ ला, २ रा हप्ता तसेच ३ % , ५ % महागाई भत्ता वेतन देयक शिबिर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कौठळी, पळसदेव व एन ई हायस्कुल निमसाखर, (ता.इंदापूर) येथे घेण्यात आले . इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी शिबिरात सहभाग घेतला . या शिबिरात तालुक्यातील ३४ शाळांनी वेतन देयक प्रस्ताव सादर केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे मॅडम, मा. अधिक्षक कविता शिंपी मॅडम वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांचे आदेशान्वये व वरिष्ठ लिपिक राजेंद्र खरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोरोना नियमांचे पालन करून शिबीर संपन्न झाले. इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे सर, निमसाखरचे बरकत डांगे सर , कौठळीचे जगताप सर, वरकुटे खुर्दचे शिंदे सर, निमगावचे देवकर सर, काटीचे कुबेर सर, भवानीनगरचे मिसाळ सर, लाकडीचे चव्हाण सर यांनी शिबिराचे काम पाहिले.
या शिबिराचे नियोजन विद्यालायचे मुख्याध्यापक संजीव नाळे सर यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा