पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचा मोठा विजय....परीक्षा ऑफ लाईन

 पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचा मोठा विजय....परीक्षा ऑफ लाईन

 

आमदार यशवंत तात्या माने, मंत्री उदय सामंत व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला विद्यार्थी हिताचा निर्णय.

प्रतिनिधि: महेश गडदे.

कला संचालनालयाने परीक्षा ऑनलाईन घोषित केल्यापासून पुणे जिल्हा कला शिक्षक संघाने सातत्याने विरोध केला प्रसंगी राज्य संघाच्या पदालाही लाथ मारली. 

तेंव्हा पासून कला संचालनालय, उच्च तंत्र शिक्षण मंत्री,आमदार कपिल पाटील,आमदार सुधीर तांबे,आमदार विक्रम काळे,मंत्री दत्ता मामा भरणे,अशा अनेक आमदार मंत्र्यांना निवेदन देऊन ऑनलाईन परीक्षा कला विषय व विद्यार्थ्यांसाठी कशी घातक आहे हे पटउन दिले वरील सर्व मान्यवरांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना भेटून परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलावा अशी शिफारस केली.

मंगळवार रोजी पुन्हा एकदा उदय सामंत साहेबाना भेटून रजिस्टर करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या, हजारो मुले वाढीव गुनांपासून वंचित राहू शकतात हे नगरचे संजय पठाडे,पुण्याचे किरण सरोदे सर,व मिलींद शेलार यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले, कला संचालक राजीव मिश्रा यांनाही काल संध्याकाळी भेटून समस्या सांगितल्या शेवटी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा उद्या या आपण यावर निर्णय घेऊ... आज मंत्रालयात झालेल्या मंत्री उदय सामंत यांचेशी झालेल्या चर्चेत कला संघटनेचा दबाव तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व एकूण परिस्थितीचा विचार करून परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय त्यांच्या सोबत झालेल्या मीटिंग मध्ये जाहीर केला या मीटिंगला मुबई कला संघटना पदाधिकारी व पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे प्रमुख किरण सरोदे सर व जिल्हा अध्यक्ष मिलींद शेलार उपस्थित होते.

या निर्णयामुळे संघटनेच्या लढ्याला फार मोठे यश आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.