विकास कामांच्या उद्घाटनाला जि.प.सदस्या अंकिता पाटील यांना कौठळी गावात विरोध.भाजप- राष्ट्रवादी मध्ये राडा.
विकास कामांच्या उद्घाटनाला जि.प.सदस्या अंकिता पाटील यांना कौठळी गावात विरोध.गावातील वर्ग-खोल्या हे राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नातूनच मंजूर:श्री.हामा पाटील.
प्रतिनिधी: महेश गडदे.
इंदापुर कौठळी गावातील वर्ग खोल्या वादाच्या भोवऱ्यात उद्घाटन झाले जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्या हस्ते कौठळी गावातील विकासकाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या असता त्यांना कौठळी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील व कार्यकर्ते यांनी विरोध केला. उद्घाटना दरम्यान मोठा गोंधळ उडाला त्या नंतर इंदापूर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन परिस्थिती हाताळली.
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी २०२२रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी रातोरात उद्घाटन नियोजन केले व जिल्हा परिषद सदस्य अंकीता पाटील व जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ पंचायत समिती सदस्य देवराज जाधव उद्घाटन करण्यास आल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष हामा पाटील सरचिटणीस वसंत मारकड सरपंच सुनील खामगळ यांनी त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी विरोध केला हे काम मंत्री दत्तात्रेय मामा भरणे व जिल्हा परिषद मा.सभापती प्रवीण माने यांच्या प्रयत्नातून मंजुर झाले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील यांनी सांगितले. कौठळी गावातील विकासकाचे उद्घाटन हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार आहे त्या नंतरच सर्व कामाला सुरुवात होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष हमा पाटील यांनी सांगितले.
राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य भारती मोहन दुधाळ यांनी केलेल्या शिफारशी नुसार कौठळी गावातील वर्ग खोल्या साठी २२लाख५०, हजार निधी मंजूर झाला आहे व त्या विकास कामांच्या उद्घाटनाला राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कार्यकर्त्यांना पुढे घालुन उद्घाटन कार्यक्रमात दडपशाही आनली असुन हे दडपशाही चे राजकारण चालू देणार नाही असे. जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा