आगोदर ऊसाचे बिल द्या मंग वीज बिलावर बोला:हामा पाटिल.
आगोदर ऊसाचं बिल मग वीज बिल.. राष्ट्रवादी कांग्रेस इंदापुर सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटिल,
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापुर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष ;हामा पाटिल,
इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,
कर्मयोगी कारखान्याचे आठ महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या ऊसाचं एक रुपया बिल दिलं नाही शेतकर्यांनवर दुहेरी संकट ओडवलं आहे,ऐकीकडे कोरोना तर दुसरीकडे कारखाना शेतकर्यांचे ऊसाचे बिल देत नाही,शेतकर्यांची दोन्ही बाजुने गळचीपी चालु आहे,
ऊसाचे बिल न देणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कळवळा न दाखवता वीज बिलाचे आंदोलन करु नये राष्ट्रवादी कांग्रेस इंदापुर सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटिल यांचा हर्षवर्धन पाटिल यांना सल्ला,
मागील आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन बंद करण्यात आली आहेत आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या मागणी बरोबर आहोत. शेतकऱ्यांना वीज सुरळीत चालू करावी या प्रश्नावर आम्ही पण ठाम आहोत, परंतु गेली आठ महिने झाले कारखान्याला ऊस जाऊन अजुन पर्यंत शेतकर्यांची ऊसाची बिले दिले नाही, शेतकर्यांना आर्थिक परिस्थितिला सामोरे जावे लागत आहे,शेतकर्यांन जवळ पैसे नाहीत तर वीज बिल कुठुन भरणार.
आता पुढील गळीत हंगाम आला आहे तरी देखील मागील ऊसांची बिले दिली नाहीत गोरगरीब शेतकर्यांनी जगायचं कसं हा प्रश्न शेतकर्यांच्या समोर आहे.
जो पर्यंत शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल दिले नाहीत तोपर्यंत वीज बिलावर बोलायचा अधिकार माजी मंत्री हर्षवर्धन पाटिल यांना नाही असे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापुर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटिल पत्रकारांशी बोलताना म्हणाले,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा