इंदापुर महादेव नगर येथे विवाह सोहळ्यामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन,
इंदापुर महादेव नगर येथे विवाह सोहळ्यामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन,
प्रतिनिधि- महेश गडदे. इंदापुर,
आज शहा महादेव नगर येथे इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षा चे अध्यक्ष मा सतीश दादा शिंगाडे यांचे भाचे श्रीकृष्ण देवकाते यांचा तेजश्री सुळ यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्या मध्ये अनावश्यक खर्च टाळून covid 19 च्या काळात जाणवत असलेल्या रक्ताचा तुटवडा या मुळे रक्तदान शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी इंदापूर तालुका रासप अध्यक्ष सतीश दादा शिंगाडे यांनी रक्तदान केले .
तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणात युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या उपक्रमाचे कौतूक या परिसरात होत आहे.
तसेच covid 19 च्या काळात रक्ताचा तुटवडा जाणव
त आहे तरी लग्न सोहळा व इतर कार्यक्रमातील अनावश्यक खर्च टाळून ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान शिबीराच आयोजन करून रक्तदान करावे असे आव्हान इंदापूर तालुका रासप अध्यक्ष सतीश दादा शिंगाडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा