इंदापुर:वालचंदनगर पोलीसांची दमदार कामगिरी

 वालचंदनगर पोलीसांची दमदार कामगिरी ! १० धारदार शस्त्रासह आरोपीला केली अटक,



 इंदापूर प्रतिनिधी : -महेश गडदे,

 इंदापूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून अशाच एका गुन्हेगारावरती वालचंदनगर पोलीसांच्या वतीने २७ एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली.

वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वालचंदनगर येथून एक जण दुचाकीवरून दहा घातक हत्यारे निघाला असल्याची बातमी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

त्यानुसार वालचंदनगर रोडवर एक संशयित दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवर काहीतरी पार्सल घेवुन येत असल्याचे दिसल्याने त्यास तात्काळ अडवून त्याचेकडील पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये १० धारदार शस्त्रे मिळुन आली आहेत सदर इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सचिन गंधारे रा . शेळगाव ता . इंदापूर असे त्याचे नांव आहे.

सदर आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेवुन त्याला अटक केली असून त्याचेवर वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये शस्त्र अधिनियम या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पो. हवा. माने, पो. ना. वायसे , पो.कॉ. चितकोटे यांनी ही कारवाई केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.