२३ एकर जागा, इमारतीच्या वर हेलिपॅड , वर्षअखेरीस बारामतीत होणार 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय ,

२३ एकर जागा, इमारतीच्या वर हेलिपॅड , वर्षअखेरीस बारामतीत होणार 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय , अजितदादांकडून प्रत्येक बाबींवर लक्ष , प्रतिनिधी -महेश गडदे, बारामती : येथे होणारे शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालय या वर्षअखेरीपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदाचे दुसरे वर्ष असून त्याला संलग्न 500 बेडसचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार उभारलेले सर्वोपचार रुग्णालय वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग युध्दपातळीवर काम करत असून कोविडच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला आहे. बारामती एमआयडीसीतील 23 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, होस्टेल व निवासस्थाने असा भव्य प्रकल्प साकारला आहे. संपूर्ण इमारतींचे क्षेत्रफळ बारा लाख स्क्वेअर फूटांचे आहे. या प्रकल्पात बारा इमारती उभारलेल्या असून सर्वोपचार रुग्णालयाची इमारत सात मजली तर वैदयकीय महाविद्यालयाची इमारत पाच मजली आहे. वसतिगृहाच्या पाच इमारती असून विद्यार्थी व विद्यार्थीनीं...