२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार,

पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. 


प्रतिनिधि-महेश गडदे,


यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तसंच लसीकरणाबाबत बैठकीत माहिती जाणून घेतली.

 या बैठकीत आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. 

यासाठी २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. 

रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. 

गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या.

 शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. 

संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा, असं अधिकाऱ्यांना सांगितलं. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा.

 आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचं सूचित केलं. 
कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे.
 यासाठी त्यांनी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी, असं सुचवलं.

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणं टाळणं, सामाजिक अंतर पाळणं, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनानं घालून दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट आहे. सर्वत्र कोविड केअर सेंटर तत्काळ सुरु करा.
 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीनं उपाययोजना गतीनं करा. 
ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरवण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.