रा.स.प अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री.बाबिर देवाचे घेतले दर्शन,नागरिकांशी संवाद साधताना केली नाराजी व्यक्त.
रा.स.प अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री.बाबिर देवाचे घेतले दर्शन,नागरिकांशी संवाद साधताना केली नाराजी व्यक्त.
इंदापूर (रुई) प्रतिनिधी- महेश गडदे
इंदापूर रुई येथे आज दि.०३/०१/२०२१ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/अध्यक्ष 'महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, माजी कॅबिनेट मंत्री,व विद्यमान आमदार महादेवरावजी जानकर साहेब 'बारामती दौऱ्यावरून रूई ता.इंदापुर जि.पुणे येथे 'महाराष्ट्रा सह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिर्थक्षेत्र श्री.बाबीर देवाच्या दर्शनासाठी आले होते.
रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री बाबीर देवाचे दर्शन घेतले व त्यांनी रुई गावातील काही नागरिकांशी संवाद साधला संवाद साधताना श्री बाबीर देवाच्या विकास कामांवर चर्चा झाली .यावेळी चर्चा दरम्यान माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार महादेव जानकर यांच्या कडे रुई गावातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या .
श्री बाबीर देवाच्या समोरील विजेचे दिवे एक वर्षापासून बंद होते ते आत्ता चालु केले,संबंध महाराष्ट्रातुन व देशभरातुन दिपावली भाऊबीजेच्या दिवशी लाखोच्या संख्येत भाविक लोक देवाच्या दर्शनासाठी येत असतात परंतु त्यांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
शौचालयाची सोय नाही जे शौचालय आहेत त्यांना व्यवस्थित पाणी येत नाही अशा अनेक अडचणी आहेत बाबीर देवाची यात्रा भरविण्यासाठी देवस्थानकडे पुरेशी जागा नाही. या सर्व विषयांवर नागरिकांनी माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे तक्रारी केल्या.
बाबिर देवाच्या दर्शनासाठी इतर दिवशी ही मोठ्या संख्येने भाविक येतात परंतु त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही शैचालयाची सोय नाही , महिलांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे.
जे कामे पूर्ण झाली आहेत ति सर्व कामे हलक्या दर्जाची असल्याने देवस्थान पर्यंत पाणी पोचले नाही. यात्रा आल्या पुरते पाणी कसेबसे पुरवायचे व इतर दिवशी येणाऱ्या भाविकांना पाण्यासाठी व शैचालायासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे नागरिकांनी सांगितले.
यावेळी बोलत असताना महादेव जानकर यांनी स्थानिक प्रशासन व गावातील राजकीय पुढारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.
माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी श्री तीर्थक्षेत्र बाबीर देवस्थान साठी आमदार फंडातून पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नागरिकांशी बोलताना सांगितले .
यावेळी माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते, नितीन दादा धायगुडे रासप नेते, शिवाजीराव शिंगाडे संचालक छत्रपती स.सा.भ.न. नानासाहेब थोरात पोलीस पाटील थोरातवाडी, 'राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस तानाजीराव मारकड, पत्रकार महेश गडदे, नितीन डोंबाळे, धनाजी शिंदे,आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा