सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार



सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार


नवी दिल्ली -

प्रतिनिधि-महेश गडदे,

 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.


पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.



आज जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहो यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.


तर कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा, आसामचे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, चंद्रशेखर काम्ब्रा, सुमित्रा महाजन, नृपेंद्र मिश्रा, दिवंगत रामविलास पासवान, दिवंगत केशुभाई पटेल, कल्बे सादिक, रजनीकांत देविदास श्रॉफ, त्रिलोचन सिंह यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.