एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ जयंती साजरी।

 एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ जयंती साजरी

इंदापुर(दि)प्रतिनिधि महेश गडदे,

गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल सेमी इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या विद्यालयांमध्ये 23 जानेवारी 2021 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेला  पुष्पहार  घालून अभिवादन करण्यात आले.



यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्य वंदना बनसुडे उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक क्लार्क, शिपाई, मावशी  यांच्या उपस्थित जयंती साजरा करण्यात आली


तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करून युवकशक्तीला स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणा करणारे व जय हिंद ही राष्ट्रीय घोषणा देणारे भारतीय स्वतंत्र लढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती साजरी होत आहे



नेताजी सुभाषचंद्र बोस  (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे भारताला आवाहन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.